यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात; नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश

 यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात;


नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश



पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले असून जलाशयातील अतिरिक्त पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते पार्श्वभूमीवर पंढरपूर-सांगोला रोड परिसरातील नागरिकांसाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला यशवंतराव चव्हाण तलाव (यमाई) तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. मगणीची दखल घेत संबंधित अधिकारी यांनी तातडीने तलाव भरून देणेबाबत आदेश दिले.  

यशवंतराव चव्हाण तलाव हा पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. तसेच पर्यटणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा तलाव आहे. सध्या तलावामध्ये अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा नसल्याने परिसरातील नागरिकांना विंधन विहिरी यांना, बोअरवेल याची पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा अडचणी प्रश्न निर्माण झाला होता. तलाव मध्ये पाणी साठा नसल्याने नगिरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे असे निवेदनात नगराध्यक्षा भालके यांनी म्हणले होते.

या यशवंतराव चव्हाण तलावावर परिसरातील विहिरी, बोअरवेल्स तसेच इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर परिसरातील शेती, पशुधन आणि नागरिकांच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास मोठा हातभार लागणार आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास तसेच जलचर व पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.