एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.
पंढरपूर | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी इंटरपुनर्शिप डेव्हलपमेंट सेल Entrepreneurship Development Cell (EDC) आणि इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल Institution’s Innovation Council (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेसाठी चंद्रकांत रामचंद्र लोंढे, अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल व बिझनेस कन्सल्टंट, हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. डी. एस.मंत्री, प्राचार्य सिंहगड,लोणावळा, पुणे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत उद्योजकता व स्टार्ट-अप क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोटोटाईपची संकल्पना, प्रोटोटाईप विकसित करण्याची प्रक्रिया, उत्पादन/प्रक्रिया डिझाईन, विकासाच्या विविध टप्प्यांतील अडचणी, उद्योगाच्या गरजेनुसार उत्पादन विकसित करणे तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिक रूपांतर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील अनुभव आणि व्यावसायिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी इंक्युबॅशन मॅनेजर डॉ. अतुल आराध्ये, ईडीसी सेल इन्चार्ज श्री. अतुल कुलकर्णी, आय आय सी व्हॉइस प्रेसिडेंट प्रा. दत्तात्रेय कोरके, उपप्राचार्य तथा आयआयसी प्रेसिडेंट डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना, स्टार्ट-अप संस्कृतीला आणि उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. महाविद्यालयाच्या अधिकृत माहितीनुसार, संस्थेचा भर नवोपक्रम, प्रकल्पाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आहे. ईडीसी विद्यार्थी वाईस प्रेसिडेंट अस्मिता राजाराम कोडलिंगे व ऐश्वर्या रामचंद्र काशीद यांनी सूत्रसंचालन करून मान्यवरांचे आभार मानले.

