कर्मयोगी विद्यानिकेतन येथे 'कर्मयोगी स्मृती महोत्सव' पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
पंढरपूर:
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये 'कर्मयोगी स्मृती महोत्सव' अंतर्गत आयोजित विविध आंतरशालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम व रजिसट्रार गणेश वाळके उपस्थित होते. यावेळी सरदेसाई मॅडम म्हणाल्या की "विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, समूहगीत, नृत्य, चित्रकला, हस्ताक्षर आणि 'स्कूल आयकॉन' अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नेत्रदीपक यश संपादन केले".
विविध स्पर्धांचा सविस्तर निकाल:
शिक्षक वक्तृत्व स्पर्धा
प्रथम: मंगेश भोसले सर (कर्मयोगी विद्यानिकेतन)
द्वितीय: वैशाली पवार मॅडम (अरिहंत पब्लिक स्कूल)
तृतीय: कौस्तुभ सर (कर्मयोगी विद्यानिकेतन) व तुकाराम चिंचणीकर सर (अरिहंत पब्लिक स्कूल)
स्कूल आयकॉन स्पर्धा
इ. ५ वी ते ७ वी (मुले): प्रथम - राघव वैभव पाठक (कर्मयोगी विद्यानिकेतन), द्वितीय - रय्यान रामचंद्र इंगळे (अरिहंत पब्लिक स्कूल CBSE).
इ. ५ वी ते ७ वी (मुली): प्रथम - प्रीत शिवराज देसाई (अरिहंत पब्लिक स्कूल CBSE), द्वितीय - आरोही अजय कदम (कर्मयोगी विद्यानिकेतन), तृतीय - स्वरा राहुल देवकर (अरिहंत पब्लिक स्कूल).
इ. ८ वी ते १० वी (मुले): प्रथम - विश्वजित दत्तात्रय डांगे (कर्मयोगी विद्यानिकेतन), द्वितीय - तेजस रमेश शिंदे (कर्मयोगी विद्यानिकेतन), तृतीय - राजवीर जयदेव टाकळकर (यशकीर्ती विद्यालय).
इ. ८ वी ते १० वी (मुली): प्रथम - ओवी शीतल कोठारी (अरिहंत पब्लिक स्कूल), द्वितीय - अनन्या रोहित देशपांडे (अरिहंत पब्लिक स्टेट स्कूल) व आर्या प्रकाश खिल्लारे (कर्मयोगी विद्यानिकेतन), तृतीय - अनिका विनायक खोले (कर्मयोगी विद्यानिकेतन).
समूहगीत स्पर्धा
इ. ५ वी ते ७ वी: प्रथम - अरिहंत स्टेट बोर्ड, द्वितीय - कर्मयोगी पब्लिक स्कूल, तृतीय - कर्मयोगी विद्यानिकेतन.
इ. ८ वी ते १० वी: प्रथम - अरिहंत पब्लिक स्कूल, द्वितीय - कर्मयोगी पब्लिक स्कूल, तृतीय - कर्मयोगी विद्यानिकेतन.
नृत्य स्पर्धा (एकल व समूह)
एकल नृत्य (इ. १ ली ते ४ थी): प्रथम - आरोही रोहित शहा (कर्मयोगी विद्यानिकेतन), द्वितीय - मुग्धा महादेव दहिवाले (प्रज्ञा प्राथमिक शाळा), तृतीय - मेघा मिथुन शिंदे (कर्मयोगी विद्यानिकेतन).
एकल नृत्य (इ. ५ वी ते ७ वी): प्रथम - किमया अभिषेक चोपडे (अरिहंत पब्लिक स्कूल), द्वितीय - अस्मिता रवी कोपर्डे (अरिहंत पब्लिक स्कूल), तृतीय - राही सचिन फुगे (कर्मयोगी किड्स फाउंडेशन).
एकल नृत्य (इ. ८ वी ते १० वी): प्रथम - तन्वी ऋतुराज भोजने (यशकीर्ती विद्यालय), द्वितीय - अनन्या रोहित देशपांडे (अरिहंत पब्लिक स्टेट स्कूल), तृतीय - प्रणाली सत्यवान वाघमारे (अरिहंत पब्लिक स्कूल).
समूह नृत्य (इ. ५ वी ते ७ वी): प्रथम - अरिहंत पब्लिक स्कूल CBSE, द्वितीय - अरिहंत पब्लिक स्कूल State, तृतीय - कर्मयोगी विद्यानिकेतन.
चित्रकला स्पर्धा
इ. १ ली ते ४ थी: प्रथम - सिद्धांत प्रणव चोपडे (अरिहंत), द्वितीय - आराध्या अविनाश गुंजकर (अरिहंत), तृतीय - वृषाली निषाद ढवळे (कर्मयोगी).
इ. ५ वी ते ७ वी: प्रथम - स्वानंदी धनंजय माने (कर्मयोगी विद्यानिकेतन), द्वितीय - स्वराली पुरुषोत्तम विभुते (कवठेकर प्रशाला), तृतीय - श्रावणी बसवराज पवार (डी. एच. कवठेकर प्रशाला).
इ. ८ वी ते १० वी: प्रथम - स्वराली सुजित इनामदार (अरिहंत), द्वितीय - विधी सुधीर जवीर (यशकीर्ती विद्यालय), तृतीय - स्वरा वैभव कुलकर्णी (अरिहंत).
हस्ताक्षर स्पर्धा
इ. १ ली व २ री: प्रथम - राजनंदिनी राहुल पवार (कर्मयोगी किड्स फाउंडेशन), द्वितीय - वेदांत अभिनंदन रणदिवे (कर्मयोगी CBSE), तृतीय - मिताली संग्राम गुत्ताळ (कर्मयोगी विद्यानिकेतन).
इ. ३ री व ४ थी: प्रथम - सोनल नीलेश पवार (कर्मयोगी किड्स फाउंडेशन), द्वितीय - वृषाली निषाद ढवळे (कर्मयोगी विद्यानिकेतन), तृतीय - श्रद्धा महेश बचुटे (कर्मयोगी किड्स फाउंडेशन).
इ. ५ वी ते ७ वी: प्रथम - कीर्ती संतोष कांबिरे (कवठेकर प्रशाला), द्वितीय - हाफिझा इम्रान मुलानी (कवठेकर प्रशाला), तृतीय - आकांक्षा नितीन देशमाने (अरिहंत).
इ. ८ वी ते १० वी: प्रथम - शरयू गणेश मेटकरी (कवठेकर प्रशाला), द्वितीय - श्रावणी सचिन इनामदार (कवठेकर प्रशाला), तृतीय - समृद्धी सागर घोडके (कवठेकर प्रशाला).
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याध्यापकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

