एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम तर्फे सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम अँड इंटरनल कंप्लेंट कमिटी (ICC) यांच्यावतीने स्ट्रेस मॅनेजमेंट- शांत रहा, मजबूत रहा मार्गदर्शन कार्यक्रम

 एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम तर्फे सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम अँड इंटरनल कंप्लेंट कमिटी (ICC) यांच्यावतीने स्ट्रेस मॅनेजमेंट- शांत रहा, मजबूत रहा मार्गदर्शन कार्यक्रम



पंढरपूर/ प्रतिनिधी 

एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम तर्फे सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम अँड इंटरनल कंप्लेंट कमिटी (ICC) यांच्यावतीने स्ट्रेस मॅनेजमेंट- शांत रहा, मजबूत रहा मार्गदर्शन कार्यक्रम १५ जुलै २०२६ रोजी घेण्यात आला. 

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम व ICC , विमेन इन इंजिनि आय ई ई ई स्टुडंट ब्रँच एस के एन एस सी ओ ई कोर्टी, आय ई ई ई महाराष्ट्र सेक्शन, तसेच द लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीमने कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी पंढरपूरातील प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या सदस्या लायन डॉ. शेरॉन भोपटकर एम डी सायकीएट्री यांचे या वयातील विद्यार्थीनींमधे असलेल्या मानसिक ताणावर मात करण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली

डॉ. शेरॉन यांनी आपल्या मार्गदर्शना मधे खालील मुद्द्यावर सोदाहरण विवेचन केले.ताण म्हणजे काय इथपासून सुरुवात करून ताणामुळे विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक स्थितीवर कसा वाईट परिणाम होतो हे सांगितले हा ताण कमी करण्यासाठी विना मार्गदर्शनाने जे उपाय केले जातात त्याने अजूनच वाईट परिणाम होतात. विद्यार्थीनी वाईट संगतीला लागते , जास्त काळ झोपते,जास्त काळ मोबाईल मधेच गुंतून पडते .घरातल्या लोकांशी फटकून वागू लागते , यातूनच नैराश्य वाढते व याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे आत्महत्येचे विचार घोळू लागतात आणी कधी कधी आत्महत्या घडतात सुद्धा. 

हे सर्व टाळायचे असेल तर प्रथमतः ताण येण्याचे कारण शोधले पाहिजे.आपली शारीरिक, बौद्धिक ताकद अजमावली पाहिजे, मर्यादांची जाणीव झाली पाहिजे, वेळच्या वेळी अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या गुणकौशल्यावर स्वतः खूष झालं पाहिजे.ताणावर उपाय शोधले पाहिजेत.सत्य परिस्थिती समोर ठेवून, आपल्या आवाक्यातील, ध्येय समोर ठेवले पाहिजे व त्यानुसार वर्तणुकीत बदल केला पाहिजे.मित्र कुटुंबाशी संवाद साधला पाहिजे.खेळ, व्यायाम, छंद याला वेळ दिला पाहिजे,स्वतःला आदर दिला पाहिजे, पुरेशी झोप व सकस आहार घेतला पाहिजे मेडिटेशनची सवय लावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. स्क्रीनपासून लांब राहण्यासाठी मनावर नियंत्रण आणले पाहिजे. अशा अनेकविध बाबींचा अवलंब करून ताण दूर केला पाहिजे. 

असे अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन डॉ. शेरॉन भोपटकर यांनी केले. 

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ए. सी. पिसे आणि प्राध्यापिका ए. ए. चांदणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील कु. समृद्धी, कु. पायल, आणि सृष्टी यांनी उत्कृष्टरीत्या केले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी विद्यार्थिनींना मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करत अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे महाविद्यालयात सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. तसेच उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींनी ताण-तणावावर सकारात्मक पद्धतीने मात करून शैक्षणिक तसेच वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी डॉ. शेरॉन भोपटकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीमच्या क्लब प्रशासक लायन ललिता कोळवले, सचिव लायन संध्या खिस्ते, उपाध्यक्ष लायन कृत्तांजली सावंत, लायन तेजस्विनी बंगाळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास 3०० विद्यार्थिनींनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.