एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड; वार्षिक ५.३० लाखांचे आकर्षक पॅकेज*

 *एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड; वार्षिक ५.३० लाखांचे आकर्षक पॅकेज*



पंढरपूर | प्रतिनिधी


गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रभावी प्लेसमेंट परंपरेचा आणखी एक मानाचा तुरा एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या शिरपेचात खोवला गेला आहे. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन विद्यार्थ्यांची जगातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी एक्सेंचर मध्ये

निवड झाली असून, त्यांना वार्षिक ५.३० लाख रुपयांचे वेतन पॅकेज मिळाले आहे.


निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अलफियाज शफी अहमद शेख आणि समर्थ दिलीप सातपुते यांचा समावेश आहे. आधुनिक तांत्रिक ज्ञान, सातत्यपूर्ण सराव, सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण आणि महाविद्यालयाच्या उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.


आयर्लंडमधील डब्लिन येथे मुख्यालय असलेली एक्सेंचर ही माहिती-तंत्रज्ञान, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, अभियांत्रिकी सेवा आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील जगातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी असून, फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीतील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो. अशा जागतिक दर्जाच्या कंपनीत सिंहगडच्या विद्यार्थ्यांची निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि सक्षम प्लेसमेंट व्यवस्थेची साक्ष आहे.

महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, अप्टिट्यूड प्रशिक्षण आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जातो. परिणामी, दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील आणि परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वेतन पॅकेजसह निवडले जात आहेत.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले "विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाबरोबरच उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यावर आमचा सातत्याने भर आहे. जागतिक बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्यांची निवड होणे ही त्यांच्या मेहनतीची आणि संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्थेची पावती आहे. आगामी काळातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

वरील विद्यार्थीची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.