पंढरपूर सिंहगडमध्ये "GATE तयारी: मूलभूत संकल्पनांपासून यशापर्यंत" विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान पंढरपूर : प्रतिनिधी

 पंढरपूर सिंहगडमध्ये "GATE तयारी: मूलभूत संकल्पनांपासून यशापर्यंत" विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी " GATE तयारी: मूलभूत संकल्पनांपासून यशापर्यंत" या विषयावर माजी विद्यार्थिनी कु. श्रद्धा कुलकर्णी व कु. मधुबाला घोडके यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. याची माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात GATE परीक्षेचे महत्त्व, परीक्षेची रचना, अभ्यासाचे योग्य नियोजन, विषयनिहाय तयारी, वेळेचे व्यवस्थापन तसेच नियमित सरावाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, मॉक टेस्टचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण अभ्यासासाठी आवश्यक धोरणे आणि GATE परीक्षेद्वारे M.Tech., संशोधन, शिष्यवृत्ती तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या उपलब्ध संधींबाबतही विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आली. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून प्रभावी तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख वक्त्या माजी विद्यार्थिनी कु. श्रद्धा कुलकर्णी व कु. मधुबाला घोडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा.सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. स्वप्निल टाकळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.