पंढरपूर सिंहगडमध्ये "पायथॉन इन इंडस्ट्री: फ्रॉम ऑटोमेशन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर व्याख्यान

 पंढरपूर सिंहगडमध्ये "पायथॉन इन इंडस्ट्री: फ्रॉम ऑटोमेशन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर व्याख्यान



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार, दिनांक ०८/०७/२०२६ रोजी "पायथॉन इन इंडस्ट्री: फ्रॉम ऑटोमेशन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर माजी विद्यार्थी आकाश कट्टे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याची माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात विद्यार्थ्यांना पायथॉन प्रोग्रामिंगचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व, ऑटोमेशन, डेटा अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशीन लर्निंग , तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज,यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये पायथॉन चा प्रभावी वापर याविषयी सखोल माहिती देण्यात आली. याशिवाय विविध उद्योगांमध्ये पायथॉन ची वाढती मागणी, आवश्यक प्रोग्रामिंग कौशल्ये, ओपन-सोर्स साधनांचा प्रभावी वापर, प्रकल्प विकासाची प्रक्रिया तसेच आय टी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख वक्ते श्री. आकाश कट्टे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभागातील प्राध्यापकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. स्वप्निल टाकळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.