पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये घोडदौड सुरूच* *चैतन्य कुलकर्णीची तीन कंपनीत निवड* वार्षिक ६.५ लाखांचे पॅकेज

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये घोडदौड सुरूच*

*चैतन्य कुलकर्णीची तीन कंपनीत निवड*

वार्षिक ६.५ लाखांचे पॅकेज



कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील घेरडी (ता. सांगोला) येथील अंतीम वर्षातील विद्यार्थी चैतन्य सुर्यकांत कुलकर्णी याची ‘डेटा फी, कॉग्नीझंट, कनका सॉप्टवेअर’ या तीन नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. डेटा फी या कंपनीमध्ये वार्षिक ६.५ लाखाचे पॅकेज, कनका सॉप्टवेअर कंपनीमध्ये वार्षिक ५ लाखाचे पॅकेज तर कॉग्नीझंट कंपनीमध्ये वार्षिक ४ लाखाचे पॅकेज मिळाले असून १ जानेवारी २०२६ रोजी चैतन्य कुलकर्णी डेटा फी कंपनीमध्ये रुजू झाला आहे.

डेटा फि कंपनी ही दुबईस्थित बहूराष्टीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना पंढरपूर येथील आनंद प्रकाश पुजारी यांनी केली असून हि कंपनी डेटा ॲनालेटिक्स आणि फायनान्स ट्रान्सफॉर्मेशच्या क्षेत्रात १५ पेक्षा जास्त वर्ष कार्यरत आहेत. या कंपनीचे पुणे, बेंगलोर येथे कार्यालय आहेत. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्याना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनियर हे पंढरपूर सिहंगड इंजिनियरींग महाविदयालयामध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य यांचा समन्वय साधून महाविदयालयाकडून उत्कृष्ठ पध्दतीचे शिक्षण आणि प्लेसमेंटची तयारी करुन घेतली जाते. यामुळे पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विदयार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षम व स्पर्धात्मक बनविण्यासाठी महाविद्यालयामार्फत विविध कौशल्यविकास उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, प्रात्यक्षिक मुलाखती, समूहचर्चा , संगणकीय प्रोग्रामिंग सराव, बुद्धिमत्ता व अभिक्षमता चाचणी प्रशिक्षण, उद्योगतज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे तसेच करिअर मार्गदर्शन कार्यशाळा यांचे नियमित आयोजन केले जाते.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यावसायिक कौशल्ये आणि रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होत असून, त्यांना नामांकित उद्योगसंस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आकर्षक वेतनाच्या रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. महाविद्यालय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व उद्योगाभिमुख मार्गदर्शन प्रदान करून त्यांच्या यशस्वी करिअर घडविण्यास कटिबद्ध आहे.

चैतन्य कुलकर्णी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रशिक्षण व नियुक्ती विभागप्रमुख डॉ. समीर कटेकर तसेच डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. संदीप लिंगे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.