कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत उल्लेखनीय यश*

 *कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत उल्लेखनीय यश*

           


 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा बालबोधिनी, राष्ट्रभाषा प्राथमिक व राष्ट्रभाषा प्रवेशिका या परीक्षांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.


 या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 

 सदर कार्यक्रमा वेळी प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई म्हणाल्या की ह्या परीक्षांचा पाठ्यक्रम अशा धर्तीवर आहे की, विद्यार्थ्यांचे व्याकरण, मौखिक-लिखित अनुवाद और संभाषण कौशल्य उत्तम होते. त्याचबरोबर, ह्या परीक्षा न केवळ भाषा शिकवतात, पण विद्यार्थ्यांना देवनागरी लिपि आणि समृद्ध हिंदी साहित्य यांच्याशी ओळख करून देतात. 

यावेळी विषय शिक्षिका सोनाली सादिगले व सारिका बनसोडे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले मिळाले.

 श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.