पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागाचे कौशल्यविकास उपक्रम यशस्वी-इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सिम्युलेशन सॉफ्टवेअरवरील प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्र उत्साहात संपन्न

 पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागाचे कौशल्यविकास उपक्रम यशस्वी-इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सिम्युलेशन सॉफ्टवेअरवरील प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्र उत्साहात संपन्न



पंढरपूर : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागामार्फत द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सिम्युलेशन सॉफ्टवेअर" या विषयावरील चार दिवसीय प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्र दि. २२ ते २५ जून २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले.

अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रयोगाधारित अध्ययनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना, कार्यपद्धती, प्रत्यक्ष हाताळणी तसेच विविध सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे डिझाइन, विश्लेषण व अंमलबजावणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बॅचनिहाय नियोजन करून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोगशाळेतील उपकरणे हाताळण्याची आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या असून त्यांच्या प्रयोगशाळेतील कौशल्यांमध्ये, समस्या सोडविण्याच्या क्षमतेत आणि उद्योगाभिमुख ज्ञानात लक्षणीय वाढ झाली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अशा प्रयोगाधारित प्रशिक्षणामुळे भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याची भावना व्यक्त केली.

या उपक्रमासाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. सोनाली गोडसे व प्रा. राहुल घोडके, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रा. वैभव गोडसे, प्रा. माधवराव नाईकनवरे, प्रा. वैष्णवी उत्पात व प्रा. स्वप्निल टाकळे, तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रा. अविनाश हराळे, डॉ. अंजली पिसे, प्रा. अनिता शिंदे व प्रा. महेश झाडे यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कौशल्याधारित प्रशिक्षणांची गरज अधोरेखित केली. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी प्रयोगाधारित शिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कौशल्यविकास उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. प्रा.अविनाश हराळे यांनी या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून भूमिका निभावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.