पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची युनो मिंडा अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड वार्षिक ५.५ लाख पॅकेजची नोकरी

 पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची युनो मिंडा अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड 

वार्षिक ५.५ लाख पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला बार्शी येथील संकेत ज्ञानेश्वर कदम तर इलेक्ट्रिकल विभागातून गादेगाव, ता.पंढरपूर येथील नेहा अजिनाथ मोरे यांची युनो मिंडा या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

युनो मिंडा ही वाहन उद्योगासाठी अत्याधुनिक घटक व तांत्रिक उपाययोजना विकसित करणारी भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सन १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, उच्च गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवांच्या बळावर जागतिक वाहन उद्योगात भक्कम स्थान निर्माण केले आहे.

कंपनी दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहने तसेच विद्युत वाहनांसाठी विविध प्रकारचे वाहन घटक आणि प्रणालींची निर्मिती करते. स्विचेस, प्रकाश व्यवस्था, ध्वनी प्रणाली, मिश्रधातूची चाके, आसन व्यवस्था, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक नियंत्रक, सुरक्षा प्रणाली, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि विद्युत वाहनांसाठी आवश्यक तांत्रिक घटकांच्या निर्मितीत कंपनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. युनो मिंडाचे उत्पादन प्रकल्प भारतासह विविध देशांमध्ये कार्यरत असून कंपनी जागतिक वाहन उत्पादक संस्थांना दर्जेदार उत्पादने पुरविते. संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासावर सातत्याने भर देत कंपनी शाश्वत आणि सुरक्षित गतिशीलतेसाठी योगदान देत आहे. उद्योगाभिमुख कार्यसंस्कृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन देणारे वातावरण यांमुळे युनो मिंडा ही अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक करिअर संधी उपलब्ध करून देणारी प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते.

अशा या कंपनीत संकेत कदम व नेहा मोरे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी , प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.