*राजेशिर्के घराण्याकडून धर्मवीरगडावर येणाऱ्यांचा सन्मान ;*
*महाराणी येसुबाईंची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव उपक्रम ;*
पुणे (प्रतिनिधि) : अहिल्यानगर जिल्हा, श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक पेडगांव येथील किल्ले धर्मवीरगडावर (बहादुरगड ) तसेच गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" भेट देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व शिव-शंभुभक्तांचा इथून पुढे शंभुपत्नी महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील म्हणजेच स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांच्या वंशजांकडून महाराणी येसुबाईंची (शाहूमाता राजाऊंची ) तसेच छत्रपती शंभुराजांची प्रतिमा भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत व सन्मान करण्याचा संकल्प केला आहे. या स्तुत्य उपक्रमाची संकल्पना राजेशिर्के घराण्याचे वंशज तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के तसेच पत्रकार, इतिहास अभ्यासक तथा गडदुर्ग संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांची आहे.
पेडगावचे शहाणे.. वेड घेऊन पेडगावला जाऊ नका.. वेड पांघरून पेडगाव जाणे..! आदी ऐतिहासिक म्हणींसाठी प्रसिद्ध असलेल्या मौजे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावर भेट देणारे पत्रकार, सोशियल मीडिया चालक, इतिहास अभ्यासक, लेखक, गडदुर्ग संवर्धक, गडदुर्ग संवर्धन संस्था , पर्यावरण संस्था, सामाजिक संघटना , शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, कलाकार, अभिनेते , व्याख्याते, शाहीर , किर्तनकार, प्रबोधनकार, राजघराण्यातील वंशज मान्यवर, सरदार घराणे, व शूरवीर मावळ्यांच्या वंशजांसह शिव-शंभुभक्तांना महाराणी येसुबाईंची प्रतिम भेट देऊन सन्मान करणार असल्याचे घराण्याचे वंशज धर्मवीरगड संवर्धक श्रीमंत लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी सांगितले. या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून महाराणी येसुबाई व स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याचा वास्तव इतिहास जगाला समजण्यास मदत होणार आहे.
या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच राजेशिर्के बंधुंचे वडिल तथा भिमा काठचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले राजेशिर्के घराण्याचे आदर्श व्यक्तिमत्व चेअरमन पै. कै. गणपतराव तुकाराम राजेशिर्के यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधात उपक्रम सुरू केला आहे. आता इथून पुढे किल्ले धर्मवीरगडावर भेट देणाऱ्यांचा स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या राजकन्या, गणोजीराजेंच्या भगिनी, शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाई व छत्रपती थोरल्या शाहूराजांच्या राजमाता माँ राजाऊ साहेबांची प्रतिमा भेट देऊन करणार आहेत. किल्ले धर्मवीरगडावर येण्यापूर्वी मान्यवरांनी व सहल आयोजकांनी व्याख्याते लक्ष्मीकांत गणपतराव राजेशिर्के यांच्या मोबाईल वर ९६२३६८४८९८ वर संपर्क साधावा असे आवाहन राजेशिर्के यांनी केले आहे.
..!

