स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पेटेंट संदर्भात दमदार कामगिरी ऑटोनॉमस अभ्यासक्रमातून घडत आहेत संशोधक अभियंते


स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पेटेंट संदर्भात दमदार कामगिरी

ऑटोनॉमस अभ्यासक्रमातून घडत आहेत संशोधक अभियंते



पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी तंत्रज्ञानावर आधारित तीन अभिनव संशोधन प्रकल्प विकसित करून त्यांचे पेटेंट प्रकाशित करण्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी केवळ संशोधन प्रकल्पच विकसित केले नाहीत तर पेटंटचा शोध (प्रायर आर्ट सर्च), पेटंट मसुदा लेखन, दावे तयार करणे, अर्ज दाखल करणे आणि पेटंट प्रकाशित होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतः पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी स्वेरीमधील संशोधन संस्कृती आणि ऑटोनॉमस अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे, हे मात्र निश्चित !



         महिलांच्या सुरक्षिततेसाठी विकसित करण्यात आलेला ‘अॅन ऑटोनॉमस वेअरेबल पर्सनल सेफ्टी सिस्टम् युटीलायझिंग मल्टी मॉडेल सेन्सर फ्युजन अँड रिअल टाईम कम्युनिकेशन’ हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परिधान करता येणारा सुरक्षा प्रकल्प स्वेरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पायल शिंदे, गौरी साळुंखे, श्रद्धा भोंग आणि आर्य परकाळे यांनी विकसित केला आहे. स्मार्ट बँड, स्मार्ट घड्याळ किंवा लॉकेटच्या स्वरूपात वापरता येणारी ही प्रणाली जीपीएस, त्वरणमापक, जायरोस्कोप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने धोकादायक परिस्थिती ओळखते. आपत्कालीन प्रसंगी ही प्रणाली आपोआप मदतीचा संदेश आणि थेट स्थानाची माहिती कुटुंबीय तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला पाठवते. ऊर्जा संवर्धनाला चालना देणारा ‘थर्मो इलेक्ट्रीक जनरेटर बेस्ड सेल्फ पॉवर्ड किचेन एक्झाष्ट सिस्टम युजिंग गॅस स्टोव्ह, वेस्ट हिट रिकव्हरी’ हा प्रकल्प ऋतुराज कोरे आणि ऋतुजा कोरे यांनी विकसित केला आहे. यामध्ये गॅस स्टोव्हमधून वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करून त्याच ऊर्जेवर स्वयंपाकघरातील धूरनियंत्रक यंत्रणा चालविण्याची अभिनव संकल्पना या प्रकल्पातून साकारण्यात आली आहे तसेच ‘क्लिअर फ्लो स्मार्ट मोनीटोरिंग इंडस्ट्रीजयल वेस्ट रीसर्क्युलेशन सिस्टम’ हा औद्योगिक सांडपाण्याचे स्मार्ट निरीक्षण व पुनर्वापर करणारा पर्यावरणपूरक प्रकल्प श्वेता कोरे, साक्षी पाटील आणि प्रतीक्षा सावंत यांनी विकसित केला आहे. ही प्रणाली सांडपाण्याची गुणवत्ता सतत तपासून त्याचा पुनर्वापर करण्यास मदत करते. स्वेरीच्या ऑटोनॉमस अभ्यासक्रमात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), उत्पादन विकास, नवोपक्रम, उद्योजकता आणि संशोधन पद्धती यांसारख्या उद्योगाभिमुख विषयांचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची दृष्टी विकसित होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी स्वतः पेटंटचा मसुदा तयार करणे, दावे लिहिणे, अर्ज दाखल करणे आणि पेटंट प्रकाशित होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत आहेत, ही बाब स्वेरीच्या सक्षम संशोधन संस्कृतीची साक्ष देणारी असून राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणात महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करत आहे. महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनपूरक वातावरण आणि प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक व औद्योगिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची संधी मिळत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पेटंट, संशोधन, स्टार्टअप, उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील उत्तम संधी उपलब्ध होत असून ते शिक्षणासोबतच संशोधक अभियंते म्हणून पुढे येत आहेत. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुख डॉ. निता तळवळकर आणि प्रा.आशुतोष गरड यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित संशोधन कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, स्वेरी संशोधन, नवोपक्रम आणि पेटंट निर्मितीच्या क्षेत्रात नवी उंची गाठत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, हे मात्र निश्चित! 


स्वेरीच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवातीपासून शिक्षणासोबतच संशोधनाची संस्कृती स्वेरीमध्ये रुजली आहे.

आजतागायत स्वेरीकडून एकूण ७९ पेटेंटस फाइल करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ७६ पेटेंटस पब्लिश झालेली असून ०३ पेटेंटस प्रोसेस मध्ये आहेत आणि एकूण ०५ पेटेंटस ग्रँट झालेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.