स्वेरीज् डी.फार्मसीचा यंदाही घवघवीत निकाल
प्रथम वर्षात सोनाली खटके प्रथम तर द्वितीय वर्षात समृद्धी दीक्षित सर्वप्रथम
पंढरपूरः श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी. फार्मसीच्या सोनाली खटके यांनी प्रथम वर्ष तर समृद्धी दीक्षित यांनी द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठया शहरात जावे लागत होते. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून व त्याचबरोबर संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या फार्मसीकरीता असणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर २० वर्षांपुर्वी डी.फार्मसी कॉलेजची स्थापना केली. या ही वर्षी विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी परीक्षेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक सोनाली खटके (८२.९० टक्के), द्वितीय क्रमांक सीमा सपाटे (८१.४० टक्के), तृतीय क्रमांक खुशबू कोरबू (८१.३० टक्के) यांनी मिळविले. तर द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसी मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक समृद्धी दीक्षित (८५.८२ टक्के), द्वितीय क्रमांक ओम थोरवत (८५.०९ टक्के ), तृतीय क्रमांक शोभा मासाळ (८४.९१टक्के) यांनी मिळवले. यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्य डॉ. सतिश मांडवे यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, सचिव डॉ. सुरज रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. डॉ. सतीश मांडवे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

