स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रा.लि.’ या नामांकित कंपनीत निवड इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गतवर्षी प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ संधी


स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रा.लि.’ या नामांकित कंपनीत निवड

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गतवर्षी प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ संधी 



पंढरपूरः ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील दोन विद्यार्थीनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली असून गतवर्षी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून नोकरीच्या ४७३ संधी मिळाल्या आहेत तर आणखी काही कंपन्यांमधील निवडीचे निकाल येणे बाकी आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

     ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंजली अंकुश पाचकवडे व प्रतिक्षा नवनाथ चौगुले या दोन विद्यार्थीनींची निवड केली. ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ‘ही कंपनी ५ वर्षे जुनी असून २०२१ साली स्थापन झाली आहे. ही कॅड, सीएई, टूल डिझाईन व प्रोडक्ट डिझाईन क्षेत्रातील एक उदयोन्मुख कंपनी असून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असते. यामुळे विद्यार्थ्यांना अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘कॅड कॅम ब्रीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.