कोर्टी येथे ‘फाटे ट्रॅक्टर्स’ तर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा!

कोर्टी येथे ‘फाटे ट्रॅक्टर्स’ तर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा!



कोर्टी (प्रतिनिधी):

येथील ‘फाटे ट्रॅक्टर्स’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन (शिवराज्याभिषेक सोहळा) अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देण्यात आला.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) उद्योग व व्यापार विभागाचे श्री. नागेश फाटे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबतच निवृत्ती भटकर, संतोष पुणेकर, ओंकार कथले, बेबन आदमीले, समाधान बागल, लखन मोरे, निलेश घोडके, वैभव तारळेकर, ऋषिकेश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. नागेश फाटे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अठरापगड जातीच्या जनतेला हक्काचे स्वराज्य मिळवून देणारा सुवर्णक्षण होता. त्यांचा पराक्रम, व्यवस्थापन आणि दूरदृष्टी आजही प्रत्येक उद्योजक आणि नागरिकासाठी प्रेरणादायी आहे."
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शिवप्रेमी आणि फाटे ट्रॅक्टर्सचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.