स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींना आयट्रिपलई, डब्ल्युआयई शिष्यवृत्ती अंतर्गत लॅपटॉप प्रदान


स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींना आयट्रिपलई, डब्ल्युआयई शिष्यवृत्ती अंतर्गत लॅपटॉप प्रदान



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील तीन विद्यार्थिनींना आयट्रिपलई, डब्ल्युआयई अर्थात ऊमेन इन इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती २०२५-२६ प्रित्यर्थ क्वेस्ट् ग्लोबल यांच्या आर्थिक सहाय्याने आणि आयट्रिपलई इंडीया फिलॅन्थ्रपी यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित उपक्रमांतर्गत लॅपटॉप प्रदान करण्यात आले.

       महिलांना अभियांत्रिकी क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या करिअर विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा लॅपटॉप वितरण समारंभ दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर ऊमेन, पुणे येथे उत्साहात पार पडला. या शिष्यवृत्तीसाठी स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या श्रेया मुकेश लखेरी व तेजस्विनी धनाजी जाधव तसेच कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तेजस्विनी कुमार यादव या तिन्ही विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक प्रगतीसाठी लॅपटॉप प्रदान करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता व आयट्रिपलई विभागाचे समन्वयक डॉ. एम. एस. मठपती, समन्वयक प्रा. स्मिता गावडे, विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी तिन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. या विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय यशामुळे स्वेरीच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळणार आहे, हे मात्र नक्की. या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने आयट्रिपलई इंडिया फिलॅन्थ्रपी, क्वेस्ट् ग्लोबल जोसेन मार्टिन आणि अशोका व विठ्ठल यांचे आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.