स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत घवघवीत यश

स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत घवघवीत यश



पंढरपूर : गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी भिगवण (जि.पुणे) येथील दत्तकला शिक्षण संस्थेत दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट संशोधन प्रकल्पांमुळे स्वेरीच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून विद्यार्थ्यांच्या विशेष कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

            स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सखोल अभ्यास करून आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रकल्प सादर केले. स्वेरी या संस्थेच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवातीपासूनच संशोधनाला प्राधान्य दिले जाते. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रभावी मांडणी यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी परीक्षक व उपस्थित मान्यवरांना प्रभावित केले. यामध्ये ‘ओरल प्रेझेंटेशन’ स्पर्धेत सृष्टी शांतिलाल झाडे व समृद्धी अनिल सुरवसे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रोख रु. ३ हजाराचे पारितोषिक मिळविले. ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत शितल प्रकाश ऐवळे व प्रतिक्षा अर्जुन गवळी यांनी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु. ३ हजारांचे रोख पारितोषिक मिळविले. तसेच ‘ओरल प्रेझेंटेशन’ स्पर्धेत स्वप्नाली धनाजी घाडगे व प्राजक्ता संतोष शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट सादरीकरणासाठी असलेल्या प्रत्येकी रु.१५०० चे रोख पारितोषिक मिळविले. या परिषदेत स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमधील तब्बल ५४ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. संशोधन विषयावर विद्यार्थ्यांनी मेहनत घेत प्रभावीपणे सादरीकरण केल्यामुळे स्वेरीत रुजविलेल्या संशोधन संस्कृतीची ताकद त्याठिकाणी अधोरेखित झाली तसेच स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मधील फार्मासुटीक्स या विभागामधील विद्यार्थी सुयश मालोजी भोसले यांनी ‘इंटरनॅशनल समिट ऑन फ्युचर– रेडी फार्मसी, इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सायन्स’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत यशस्वी सहभाग नोंदविला. वालचंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) मध्ये फडतरे नॉलेज सिटी क्लब यांच्या तर्फे दि. ६ व दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजिलेल्या या परिषदेत महाविद्यालयातीलच विद्यार्थी दुर्वेश शंकर बुरसे यांनी ‘फार्म्युलेशन अँड इव्हाल्युशन ऑफ लिक्विड बेस्ड ड्राय डिलिव्हरी सिस्टीम’ या विषयवार आयोजिलेल्या संशोधन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या सर्व यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. हेमंत बनसोडे व इतर शिक्षकवृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ठसा अधिक ठळक झाला असून भविष्यातही विद्यार्थी संशोधन क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करतील असा विश्वास पंढरपूर पंचक्रोशीत व्यक्त करण्यात येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.मांडवे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.