देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग : पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकाथॉन २०२६’ चे आयोजन*

 *देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग : पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकाथॉन २०२६’ चे आयोजन*



पंढरपूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग व एसीएसईएस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ व १४ मार्च २०२६ रोजी “सिंहगड हॅकाथॉन २०२६” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, तांत्रिक कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा या हॅकाथॉनचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांवर अभिनव उपाय विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी ब्लॉकचेन व सायबर सिक्युरिटी, कम्प्युटेशनल इंटेलिजन्स, स्मार्ट एज्युकेशन, अ‍ॅग्रीकल्चर, हेल्थटेक तसेच इतर नाविन्यपूर्ण विषयांवर प्रकल्प सादर करता येतील. या स्पर्धेसाठी एकूण ७६,००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी ५१,००० रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी २५,००० रुपये देण्यात येणार आहेत.

देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भारतातील विविध राज्यांमधील सुमारे १०० संघांमधून जवळपास ५०० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे ब्राझील येथूनही एका आंतरराष्ट्रीय संघाने या स्पर्धेसाठी नोंदणी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी तसेच विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नामदेव एम. सावंत असून सहसंयोजक म्हणून प्रा. सुमित एस. इंगोले व प्रा. बी. बी. जगदाळे कार्यरत आहेत. तसेच कार्यक्रमासाठी विद्यार्थी समन्वयक म्हणून कु. कुलदीप गोडसे हे काम पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad