पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न*

 पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न



पंढरपूर | प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागामार्फत शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रशिक्षण व नियोजन विभाग प्रमुख डॉ. समीर कटेकर, महाविद्यालयाचे सीएसआर अधिष्ठाता डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली पिसे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

या मेळाव्यात विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विभागातील शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम तसेच प्रशिक्षण व नियोजन विभागाच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती पालकांना दिली.

यावेळी पालक प्रतिनिधी शिक्षिका ताई ठोंबरे तसेच प्रा. नीता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान सोलापूर विद्यापीठात गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या तसेच एनपीटीईएल परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणाकडे वाटचाल करून योग्य दिशेने प्रगती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिता शिंदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad