कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.*

 *कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.*

 


कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२६”

विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पंढरपूर येथे गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी “कर्माटेक २०२६” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

याबाबत ची अधिक माहिती देताना "कर्माटेक २०२६" चे संयोजक डॉ. अभय उत्पात म्हणाले की “कर्माटेक २०२६” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये कोड फोर्सेस, रोबो रेस, टेक्नो रिल्स, इलेक्ट्रॉनिक्स क्विझ, सर्किट सुडोकू, ब्रिज मॉडेल मेकिंग, ग्रीन बिल्डिंग, बेस्ट फ्रॉम वेस्ट, प्रोजेक्ट एक्सिबीशन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या सर्व स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर होतील. तसेच सदरच्या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस पी पाटील व “कर्माटेक २०२६" चे संयोजक डॉ. अभय उत्पात व समन्वयक डॉ.एस व्ही एकलारकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.