पंढरपूर तालुक्यातील १४० शेतकऱ्यांचे १ कोटी २० लाख रुपये थकीत; अधिवेशनात आवाज उठवण्याची मागणी

 पंढरपूर तालुक्यातील १४० शेतकऱ्यांचे मका विक्रीचे १ कोटी २० लाख रुपये थकीत; अधिवेशनात आवाज उठवण्याची मागणी



पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका खरेदी विक्री संघाकडे विक्री केलेल्या मक्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांकडे धाव घेत विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याची मागणी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी मका खरेदी विक्री संघाकडे आपला मका विक्रीस दिली होता. या खरेदीची एकूण रक्कम १ कोटी २० लाख रुपये इतकी असून ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. १० जानेवारी महिन्यात मका खरेदी झाल्यानंतरही पेमेंट न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.


या संदर्भात शेतकऱ्यांनी आपली अडचण सांगत आ. समाधान आवताडे,आ. अभिजीत पाटील यांनी मका खरेदीची थकीत रक्कम तात्काळ मिळवून देण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली.

शेतीसाठी घेतलेले कर्ज, खत-बियाणे व इतर खर्च भागविण्यासाठी या पैशांची अत्यंत गरज आहे. पैसे न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.


यावर आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत हा प्रश्न अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.


दरम्यान, थकीत रक्कम लवकर मिळाली नाही तर शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad