संशोधनाचे उद्योगात रूपांतर : पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात टीआरएल-एमआरएल कार्यशाळा उत्साहात

 *संशोधनाचे उद्योगात रूपांतर : पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात टीआरएल-एमआरएल कार्यशाळा उत्साहात*



कोर्टी (पंढरपूर) : येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर अँड डी विभाग आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी ) यांच्या संयुक्त विद्यमाने “टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल (टीआरएल)” आणि “मॅन्युफॅक्चरिंग रेडीनेस लेव्हल (एमआरएल)” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यशाळेची रूपरेषा मांडताना संशोधन क्षेत्रात टीआरएल व एमआरएल या संकल्पनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, टीआरएल ही तंत्रज्ञानाची प्रगती मोजणारी 9 स्तरांची प्रणाली असून एमआरएल ही उत्पादन प्रक्रियेची तयारी दर्शवणारी प्रणाली आहे. या दोन्ही संकल्पना संशोधनाचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते पर्यावरण अभियंता, इनोव्हेशन एज्युकेटर तसेच मिलूप फूड प्रा. लि. चे संचालक श्री. शंतनु संजय पाटील होते. त्यांनी टीआरएल आणि एमआरएल फ्रेमवर्कच्या माध्यमातून “लॅब टू मार्केट” या प्रवासाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनातील कल्पना उद्योगात कशा रूपांतरित होतात, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले तसेच स्टार्टअप्स व नवउद्योजकांसाठी आवश्यक कौशल्यांवरही प्रकाश टाकला.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी-आधारित शिक्षणाद्वारे टीआरएल आणि एमआरएल संकल्पना प्रत्यक्ष अनुभवता आल्या. विविध गटांमध्ये काम करून त्यांनी संशोधनाचे औद्योगिक रूपांतर कसे करावे, याची सखोल समज मिळवली.

ही कार्यशाळा “आर अँड डी अवेअरनेस अँड कॅपॅसिटी बिल्डिंग” या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन नवकल्पनांना चालना मिळाली.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढण्यास तसेच नवकल्पनांना चालना मिळण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच डॉ. अतुल आराध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रा. अर्जुन मासाळ व प्रा. महेश झाडे यांनी समन्वयक म्हणून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. अनम बेद्रेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.