पंढरपूर सिंहगडमध्ये आधुनिक अनुप्रयोग वितरण जाळे व भार संतुलन विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये आधुनिक अनुप्रयोग वितरण जाळे व भार संतुलन विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न*



पंढरपूर : येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभाग आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (एसीएसईएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲस्पायर’ ऑनलाईन व्याख्यानमालिकेअंतर्गत मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी “आधुनिक अनुप्रयोग वितरण जाळे व भार संतुलन” या विषयावर विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस.व्ही. पिंगळे यांच्या प्रास्ताविकाने करण्यात आली,  त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून सत्रास प्रारंभ करण्यात आला.

या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील ‘रेड एज्युकेशन’ संस्थेचे वरिष्ठ प्रशिक्षक श्री. नितीन कुलकर्णी उपस्थित होते. त्यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील २६ वर्षांहून अधिक अनुभव असून ते सायबर सुरक्षा तज्ज्ञ, सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सिस्को, मायक्रोसॉफ्ट, रिव्हरबेड, एफ-५ नेटवर्क्स, पॅलो आल्टो आणि चेक पॉईंट यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून ५० हून अधिक प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.

श्री. कुलकर्णी यांनी आधुनिक अनुप्रयोग वितरण जाळे (एडीएन) आणि भार संतुलन या संकल्पनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, सध्याचे औद्योगिक उपयोग, तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी यांवर मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी संवादात्मक पद्धतीने सखोल उत्तरे दिली, त्यामुळे सत्र ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, संगणक विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी “हे सत्र अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी होते,” अशी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

कार्यक्रमाची सांगता प्रा. सुमीत इंगोले यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. या सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.