सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची जलशुध्दीकरण प्रकल्प पंढरपूर येथे औद्योगिक भेट*

 *सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची जलशुध्दीकरण प्रकल्प पंढरपूर येथे औद्योगिक भेट*



सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक १० मार्च २०२६ रोजी जलशुद्धीकरण प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास औद्योगिक भेट दिली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

ही भेट पंढरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्र तसेच गोपाळपूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. परिणामाधारित शिक्षण पद्धतीवर आधारित या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

स्थापत्य अभियांत्रिकीमधील जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाचे विषय असून, अभ्यासक्रमामध्ये त्यांचे सखोल अध्यापन केले जाते. प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट दिल्यामुळे या प्रक्रियांविषयीची समज अधिक स्पष्ट होते. विविध प्रक्रिया, त्यासाठी वापरले जाणारे घटक, तसेच प्रत्येक टप्प्यासाठी लागणारा कालावधी यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली.

जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाण्याचा स्रोत, पाणी शुद्ध करण्याच्या विविध टप्प्यांची प्रक्रिया, तसेच शुद्ध पाणी शहरातील घरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था यांचा अभ्यास करण्यात आला. तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये औद्योगिक, घरगुती व सार्वजनिक क्षेत्रातून जमा होणाऱ्या दूषित पाण्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले.

ही औद्योगिक भेट स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली. या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. यशवंत पवार, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. शेखर पाटील, प्रा. ओमकार बिडकर तसेच विभागातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.