पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश येत आसल्यामुळेच विरोधक विकास कामाला विरोध करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 


पंढरपूर 

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश येत आसल्यामुळेच विरोधक विकास कामाला विरोध करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


 पंढरीचा विकास करू, धुळमुक्त पंढरी करू, स्वच्छ पिण्याचे पाणी देऊ अशी आश्वासन नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी दिली होती. मात्र या आश्वासनापैकी एकही काम होत नसल्यामुळे अवघ्या काही महिन्यातच नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जनतेचे लक्ष भटकविण्यासाठीच काही नेत्यांनी विकासकामे करण्यापेक्षा विकासाला विरोधच सुरू केला आहे. वास्तविक उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार असून याला सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे.


सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या विशेष प्रयत्नातून पंढरपूर शहरातील मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे या उड्डाण पुलामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर होणार असून यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे. पुणे मुंबईच्या धरतीवर पंढरपुरात उड्डाणपूल व्हावे याकरिता जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सातत्याने हा विषय लावून धरला व त्यास मंजुरी आणून निधी देखील उपलब्ध केला आहे सध्या या पुलाचे काम प्रगतीपथावर असून विरोधक फक्त राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत. या उड्डाणपूलामुळे व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसून उलट वाहतूक कोंडी कमी होईल त्यामुळे व्यापार आणि दळणवळण सोयीस्कर होणार होईल. हा उड्डाणपूल झाल्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांना थेट कॉलेज पर्यंत रस्ता उपलब्ध होईल. उपनगर थेट शहराशी जोडला जाईल.. दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मिटेल.. तसेच अवघ्या काही मिनिटात उपनगरात पोहोचणे सोयीस्कर होईल लाखो भाविकांची सोय होईल व पंढरपूरच्या वैभवात भर पडेल...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad