पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागात करिअर मार्गदर्शनपर संवाद सत्र*

 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागात करिअर मार्गदर्शनपर संवाद सत्र*



एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर माजी विद्यार्थी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवाची माहिती मिळावी तसेच करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे हा होता.


या सत्रासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. प्रतीक रुपनर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ते शिवशक्ती एंटरप्रायझेस, कामोठे, नवी मुंबई या संस्थेचे मालक असून गव्हर्नमेंट लायसन्स्ड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते अदानी होल्डिंग्समध्येही कार्यरत असून उद्योग क्षेत्रात व्यावसायिक अनुभव घेत आहेत.


या संवाद सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना “करंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग अँड पॉवर प्रोजेक्ट्स” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एल.टी. (लो टेन्शन), एच.टी. (हाय टेन्शन) आणि डी.टी.सी. (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर) यासंबंधित विद्युत कामे, औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील विद्युत प्रतिष्ठापन, तसेच इलेक्ट्रिकल वायरिंगच्या देखभालीबाबत माहिती दिली.


तसेच इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रातील करिअर संधींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून औद्योगिक प्रकल्प, वीज वितरण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, बांधकाम क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची मोठी मागणी असते. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर सरकारी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर परवाना घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. तसेच अनुभव मिळाल्यानंतर मोठ्या कंपन्यांचे सब-कॉन्ट्रॅक्ट्स घेऊनही काम करता येते. योग्य कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन क्षमता असल्यास या क्षेत्रात उत्तम करिअर घडविता येते.


कार्यक्रमास विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. अंजली ए. चांदणे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या संवाद सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.


शेवटी विभागामार्फत श्री. प्रतीक रुपनर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad