एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात अतिथी व्याख्यान संपन्न

 *एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात अतिथी व्याख्यान संपन्न*



सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी,  पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग व आईईई स्टुडंट ब्रँच एसकेएनएससीओई, कोर्टी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ मार्च २०२६ रोजी “ॲप्लीकेशन ऑफ इंजिनियरींग इकॉनॉमिक्स इन इंडस्ट्री” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११.०० वाजल्यापासून संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठ, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका सौ. सुषमा कोटगिरी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.


आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये सौ. सुषमा कोटगिरी यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी अर्थशास्त्राचे महत्त्व, खर्च विश्लेषण, ब्रेक-इव्हन विश्लेषण, गुंतवणूक निर्णय तसेच उद्योगातील आर्थिक नियोजन यांसारख्या विविध संकल्पनांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी उद्योगातील प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अर्थशास्त्राच्या संकल्पनांचा उद्योग क्षेत्रात कसा उपयोग होतो याबाबत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आर्थिक निर्णय प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली.


या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख व आईईई स्टुडंट ब्रँच काऊंन्सीलर  डॉ. के. शिवशंकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक सौ. अंजली ए. चांदणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


या अतिथी व्याख्यानाला विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad