पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग उपनियमानुसार” विषयावर कार्यशाळा संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग उपनियमानुसार” विषयावर कार्यशाळा संपन्न*



कोर्टी-पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी “बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग उपनियमानुसार” या विषयावर अतिथी व्याख्यान व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमजली इमारतींचे नियोजन, डिझाइन व उपनियमानुसार त्याची योग्य पडताळणी या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी सौ. किमया थोटांगरे या तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगची संपूर्ण प्रक्रिया, उपनियमानुसार आराखडा कसा तयार करावा तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह तांत्रिक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प नियोजन, आराखडा पडताळणी व भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीसाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले. कार्यशाळेदरम्यान सुमारे ६० विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या आर.सी.सी. इमारतींचे मॉडेलिंग, प्लॅनिंग व उपनियमानुसार रचना समजून घेतली.

सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) डॉ. चेतन पिसे यांच्या संकल्पनेतून तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ . श्रीगणेश कदम, अधिष्ठाता डॉ. यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यशाळा समन्वयक प्रा. शेखर पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतिनिधी अर्पिता भोसले, स्नेहा कदम व सावित्रा सांगोलकर यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad