अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी सातत्याने परिश्रम घेतले. - डॉ. पी.आर. कुलकर्णी स्वेरीमध्ये ‘संत गाडगेबाबांची १५० वी जयंती’ साजरी


अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी सातत्याने परिश्रम घेतले.

                                                                                - डॉ. पी.आर. कुलकर्णी

स्वेरीमध्ये ‘संत गाडगेबाबांची १५० वी जयंती’ साजरी




पंढरपूर- ‘महाराष्ट्राला अनेक थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे राज्याला संतांची भूमी असे म्हटले जाते. या ठिकाणी अनेक संत होवून गेले त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज होय. रंजल्या- गांजलेल्यांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा असायची. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.’ असे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वरिष्ठ प्रा. डॉ. पी.आर. कुलकर्णी यांनी केले.

        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वरिष्ठ प्रा. डॉ. पी.आर. कुलकर्णी हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पुढे डॉ. पी. आर. कुलकर्णी म्हणाले की, 'गाडगे बाबा’ यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. पण नागरिक त्यांना त्यांच्या कार्यामुळे आणि समाजसेवेमुळे 'गाडगे बाबा’ म्हणून ओळखू लागले. गाडगेबाबांना एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. अत्यंत साधेपणा, गरिबी, अंगावर फाटके तुटके परंतु स्वच्छ असणारे कपडे असे गाडगे बाबांचे राहणीमान होते. गाडगे बाबांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेटी देत असत. अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक हेच त्यांचे दैवत होते.’ असे सांगून डॉ. कुलकर्णी यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचे महत्व सांगून समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, पाचही विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. डॉ. नीता तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.