कष्ट, गुणवत्ता आणि जिद्दीचे फळ : संरक्षण संशोधनाच्या शिखरावर सिंहगड महाविद्यालय, पंढरपूरचा विद्यार्थी सचिन हिंचगेरी

 कष्ट, गुणवत्ता आणि जिद्दीचे फळ : संरक्षण संशोधनाच्या शिखरावर सिंहगड महाविद्यालय, पंढरपूरचा विद्यार्थी सचिन हिंचगेरी




एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी ही घटना अत्यंत गौरवास्पद व अभिमानास्पद असून, महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची तसेच संशोधनाभिमुखतेची ठळक साक्ष देणारी आहे.

महाविद्यालयातील होतकरू व गुणवंत विद्यार्थी कु. सचिन भीमराया हिंचगेरी यांची भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या संरक्षण संशोधन व विकास (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन ) अंतर्गत टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरी, रामगड, जिल्हा पंचकुला, हरियाणा येथे टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरी इंटर्न म्हणून निवड झाली आहे.

ही निवड त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि संशोधनातील आवडीचे फलित असून, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

डिआरडीओ ही देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारी भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था असून, क्षेपणास्त्र प्रणाली, बॅलेस्टिक्स, उच्च ऊर्जा प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स, रडार, सेन्सर्स व संरक्षण प्रणालींच्या विकासात तिचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेत संशोधन इंटर्न म्हणून निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब मानली जाते.

कु. सचिन हे डिआरडीओ अंतर्गत संरक्षण संशोधनाशी संबंधित अत्याधुनिक प्रकल्पांवर कार्यरत असून “हाय व्होल्टेज (४८० केव्ही ते ३.५ मेगाव्होल्ट) पल्स जनरेटर” या उच्च ऊर्जा तंत्रज्ञानावर आधारित संशोधनकार्य करीत आहेत. हे तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रातील बॅलेस्टिक चाचण्या, उच्च ऊर्जा प्रयोग व आधुनिक संरक्षण प्रणालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे.

हे उल्लेखनीय यश महाविद्यालयातील भक्कम शैक्षणिक पाया, संशोधनपूरक वातावरण, प्रयोगशील शिक्षणपद्धती तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. ही निवड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. शिवशंकर कोंडूरू, इंटर्नशिप समन्वयक प्रा. नागन्नाथ व्ही. खांडेकर व विभागातील सर्व शिक्षकवर्ग यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली शक्य झाली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था व संरक्षण क्षेत्रात कार्य करण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत.

महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी समुदाय यांनी कु. सचिन भीमराया हिंचगेरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या संशोधनप्रधान, यशस्वी व देशसेवेस समर्पित भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad