सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात शाश्वत बांधकाम तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्न

 सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात शाश्वत बांधकाम तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्न



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “इनोव्हेटिव्ह अँड सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी” या विषयावर सहा दिवसीय दि. १२ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी (स्टुडंट चॅप्टर) यांच्या सहकार्याने पार पडली.

या कार्यशाळेमध्ये विविध क्षेत्रातील शिक्षण तज्ञ व उद्योग तज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व डीन डॉ. चेतन पिसे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

सदर कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील डॉ. विनायक पत्की यांनी “ऑप्टिमायझेशन अँड परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ वेस्ट बेस्ड बर्न्ट क्ले ब्रिक” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी वेस्ट मटेरियलचा वापर करून तयार होणाऱ्या ब्रिक्सची गुणवत्ता, ताकद व पर्यावरणीय फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, सोलापूर येथील इंजिनिअर राजेश कांबळे यांनी “सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल” या विषयावर व्याख्यान दिले. सध्याच्या काळात ग्रीन कन्स्ट्रक्शन आणि एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली मटेरियलचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

तिसऱ्या दिवशी कॅटालिस्ट सोल्युशन, पुणे येथील इंजिनिअर व्यंकट पाटील यांनी “सस्टेनेबल हाऊस कन्स्ट्रक्शन इन रुरल एरिया” या विषयावर सत्र घेतले. ग्रामीण भागातील लो कॉस्ट, ड्युरेबल आणि इको-फ्रेंडली हाऊसिंग सोल्युशन्स याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

चौथ्या दिवशी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील डॉ. महेश कल्याणशेट्टी यांनी “इंटिग्रेटेड सोईल स्ट्रक्चर इंट्रॅक्शन मॉडेलिंग फॉर सस्टेनेबल अँड रेझिलियंट स्ट्रक्चरल डिझाईन” या विषयावर सविस्तर माहिती दिली. सेफ आणि स्टेबल स्ट्रक्चर्ससाठी या तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

पाचव्या दिवशी आय. आय. टी. गुवाहाटी येथील डॉ. संतोष जगताप यांनी “इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट डिझाईन” या विषयावर मार्गदर्शन केले. आयडिया ते प्रॉडक्ट हा प्रवास, रिसर्च, डिझाईन थिंकिंग आणि स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज यावर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यशाळेच्या सहाव्या व शेवटच्या दिवशी ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील डॉ. सतीश देशमुख यांनी “बिल्डिंग टुमारो : इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी फॉर लो कार्बन फ्युचर” या विषयावर व्याख्यान दिले. लो-कार्बन टेक्नॉलॉजीमुळे भविष्यातील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री कशी बदलणार आहे, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. शिक्षणतज्ञ व उद्योग तज्ञ यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत पवार यांनी पार पडले तसेच आभार प्रदर्शनात सर्व मान्यवर वक्ते, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरता स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.