रांजणी येथे नागोबा मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

 रांजणी येथे नागोबा मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न


आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन



रांजणी - प्रतिनिधी 


पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे श्री नागोबा मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार लोकनेते मा. श्री. समाधान (दादा) आवताडे यांच्या आमदार निधीतून या सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे.



यावेळी जुना एकलासपूर  ते महादेव ढोले वस्ती रस्ता मुरुमीकरण कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या विकासकामांमुळे गावातील दळणवळणाच्या सुविधांना मोठा फायदा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याच्या अडचणी मुळे अनेक गोष्टीचा सामना करावा लागत होता मात्र मुरुमीकरणांनतर हा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आमदार समाधान (दादा) आवताडे उपस्थित होते,प्रमुख उपस्थितीत  युवा नेते प्रणव परिचारक कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती मा. श्री. हरिष (दादा) गायकवाड, जलसंधारण अधिकारी मा. श्री. पंडित भोसले साहेब यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी रांझणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव पाठीशी राहू, तसेच रांझणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. धार्मिक व सामाजिक सुविधा बळकट झाल्या तर गावाच्या एकतेला बळ मिळते, असा विश्वास व्यक्त केला. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य गावाच्या प्रगतीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी रांजणी गावच्या विद्यमान सरपंच सौ. स्वाती हेमंत दांडगे यांच्या निवासस्थानी पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार लोकनेते आदरणीय श्री. समाधान (दादा) आवताडे यांनी युवक नेते मा. श्री. प्रणवजी परिचारक (मालक) यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली.


यावेळी सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने आमदार महोदयांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. हा सत्कार आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपुलकीने स्वीकारत ग्रामस्थांशी संवाद साधला. भेटीदरम्यान गावाच्या विकासासंदर्भात पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार व कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू करण्यात आली असल्याचे दिसून आले,गाव व परिसरातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घेत विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व शांततेत पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad