नगराध्यक्षांनी दिली पोलीस संकुलातील सीसीटीव्ही केंद्राला अचानक भेट

 पंढरीतील सर्व सीसीटीव्ही सुरू करा 


नूतन नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता ताई भालके यांच्या सूचना 


नगराध्यक्षांनी दिली पोलीस संकुलातील सीसीटीव्ही केंद्राला अचानक भेट



पंढरपूर/प्रतिनिधी 



*सी.सी.टी.व्ही म्हणजे सुरक्षा आणि देखरेखीसाठी वापरली जाणारी एक व्हिडिओ पाळत ठेवण्याची प्रणाली असून सध्या नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये असलेल्या पोलीस संकुल येथील सी.सी.टी.व्ही. कंट्रोल रूमला लोकनियुक्त कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा

*डॉ.सौ.प्रणिताताई भगीरथ भालके यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी अनेक कॅमेरे बंद अवस्थेत दिसून आले. त्यावेळी सर्व कॅमेरे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनास दिलेल्या आहेत. 



सध्या पंढरपूर शहरातील 157 पैकी 65 ते 70 कॅमेरे चालू स्थितीत असून, शहरातील सर्व कॅमेरे चालू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नूतन नगराध्यक्षांची कार्यतत्परता यावरून दिसून येऊ लागली आहे. 

  नूतन नगराध्यक्ष डॉ प्रणिताताई भालके यांनी शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आपली पावले उचलली आहेत. त्यातही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे आवश्यक आहेत. त्यामुळे पोलिसा वरील ताण कमी होऊन नागरिकांच्याही समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. त्यासाठीच पंढरपूर शहरातील बंद अवस्थेत असलेले शिशी टीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad