एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपुर – मुलींसाठी रोजगारक्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

 एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपुर – मुलींसाठी रोजगारक्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम



पंढरपुर – 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी, पंढरपुर येथे 02 जानेवारी 2026 ते 08 जानेवारी 2026 दरम्यान महिंद्रा प्राइड क्लासरूम आणि नांदी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ट्रेनिंग ऑन एम्प्लॉयबीलीटी व्युईथ एम्पथी फॉर गर्लस” या रोजगारक्षमतेवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सहा दिवसांच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक रोजगारक्षमता कौशल्ये, आत्मविश्वास, संप्रेषण कौशल्ये, मुलाखतीतील तयारी, टीमवर्क व सॉफ्ट स्किल्स यांचे सखोल प्रशिक्षण देणे होते.

प्रशिक्षणाचे आयोजन व मार्गदर्शन प्रशिक्षक प्रियांका शर्मा  यांनी केले.  या प्रशिक्षणात  (तृतीय वर्ष) संगणक शास्त्र व स्थापत्य अभियांत्रिकी  या शाखेतील महिला विद्यार्थिनींना भाग घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना नोकरीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कौशल्यांबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित व्यवहारिक व्याख्याने व सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामधून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थिनींना भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी सज्ज करण्यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधींसाठी सज्ज करत असून, भविष्यातील करिअरसाठी त्यांना सक्षम बनवत आहेत. 

हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.