सत्कार सोहळा : सिंहगड कॉलेज पंढरपूरमध्ये ज्येष्ठ अकाउंट क्लर्क श्री.भालचंद्र राऊत यांचा गौरव

 सत्कार सोहळा : सिंहगड कॉलेज पंढरपूरमध्ये ज्येष्ठ अकाउंट क्लर्क श्री.भालचंद्र राऊत यांचा गौरव



पंढरपूर (प्रतिनिधी) :

सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथील ज्येष्ठ कार्यालयीन लिपिक (Senior Account Clerk)श्री.भालचंद्र राऊत सर यांचा वयाच्या ६० व्या वर्षी, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

राऊत सरांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, मेहनत व शिस्त या गुणांच्या आधारे महाविद्यालयाच्या आर्थिक विभागात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या सेवेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलास करांडे सर, व्हॉइस प्रिन्सिपल डॉ. स्वानंद कुलकर्णी सर, श्री. संजय बनकर, श्री. नवनाथ माळी, श्री. एकनाथ इंगोले, श्री. विकास इथापेव श्री. योगेश नवले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राऊत सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.

सत्कारानंतर उपस्थितीनी सरांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि सहकार्यशील स्वभावाचे मनोगत व्यक्त केले. त्यांनी नेहमीच सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले व कार्यसंस्कृतीला नवा आयाम दिला, असेही मत व्यक्त करण्यात आले.

प्राचार्य डॉ. कैलास करांडे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

“राऊत सरांनी नेहमी संस्थेच्या प्रगतीसाठी मनापासून काम केले. त्यांचा प्रामाणिकपणा व कार्यतत्परता विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी आदर्शवत आहे.”

शेवटी राऊत सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,

 “सिंहगड कॉलेज हे माझ्यासाठी केवळ कार्यस्थान नसून एक परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्यांचे प्रेम, सहकार्य आणि आपुलकी आयुष्यभर लक्षात राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास इथापे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश नवले यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रम अतिशय आनंददायी वातावरणात पार पडला.शेवटी उपस्थित सर्वांनी श्री. भालचंद्र राऊत सरांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad