पंढरपूरसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची महत्त्वाची मागणी

 पंढरपूरसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मा.आमदार प्रशांत परिचारक यांची महत्त्वाची मागणी



पंढरपूर : पंढरपूर शहरातील नागरिकांच्या सुविधा आणि वारकरी भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


पंढरपूर शहरातील नामसंकिर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सुमारे ₹20 कोटींचा निधी आवश्यक आहे. तसेच शहरात कार्यरत असलेल्या 35 एम.एल.डी. क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि 20 एम.एल.डी. क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या वीजबिलामुळे नगरपरिषदेवर दरवर्षी ₹7 ते ₹8 कोटी इतका मोठा आर्थिक भार पडतो.


या खर्चात बचत करण्यासाठी 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविल्यास दर महिन्याला सुमारे ₹70 ते ₹80 लाखांची बचत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक निधी नगरविकास विभागामार्फत उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्राद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad