*पंढरपूर सिंहगडमध्ये फुल स्टॅक वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट कार्यशाळा यशस्वी*
कोर्टी, ता. पंढरपूर (दि. १३ ऑक्टोबर २०२५):
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित “फुल स्टॅक वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट - React JS व Node JS आधारित मूल्यवर्धन कार्यशाळा” दि. ३ ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेचा समारोप १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या दहा दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना उद्योगपातळीवर वापरल्या जाणाऱ्या React JS व Node JS या आधुनिक वेब विकास तंत्रज्ञानांचा वापर करून फुल स्टॅक वेब ऍप्लिकेशन कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध रिअल-टाइम प्रोजेक्ट्सवर काम करत, फ्रंट-एंड (React JS) आणि बॅक-एंड (Node JS) या दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर करून पूर्ण कार्यशील वेब ऍप्लिकेशन विकसित करण्याचा अनुभव घेतला. तसेच, सॉफ्टवेअर विकास प्रक्रियेतील समस्या निराकरण कौशल्ये आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान शिकवण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक श्री. सूरज पवार (लीड सॉफ्ट सोल्यूशन्स, धाराशिव) यांनी React JS व Node JS वापरून वेब ऍप्लिकेशन तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले. React JS च्या साहाय्याने यूजर इंटरफेस डिझाइन करणे तर Node JS द्वारे सर्व्हर-साइड लॉजिक हाताळण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करत दिले गेले.
कार्यक्रमाचा समारोप संगणक विभागप्रमुख डॉ. सुभाष व्ही. पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी वेब विकास क्षेत्रात सक्षम आणि मजबूत व्यावसायिक म्हणून उभे राहतील.
कार्यशाळेचे आयोजन समन्वयक श्री. सोमनाथ झांबरे, प्रा. नामदेव सावंत आणि संपूर्ण विभागातील शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.
आयोजकांनी विश्वास व्यक्त केला की, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी मिळवलेली तांत्रिक कौशल्ये त्यांना वेब तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम व्यावसायिक म्हणून स्थान निर्माण करण्यात मोलाची ठरतील.

