पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण संपन्न

 पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण संपन्न



पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत असणा-या सर्व शाखेतील विदयार्थ्यांसाठी ५ दिवसांचे कॅम्पस प्लेसमेंट तयारीकरीता आवश्यक असणा-या सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण दि.०५ ऑगस्ट २०२५ ते ०९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपन्न झाल्याची माहिती महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयाने कॅम्पस प्लेसमेंट क्षेत्रामध्ये महत्वाचा ठसा उमटवला आहे. या अनुषंगाने २०२८ मध्ये पासआऊट होणा-या विदयार्थी वर्गासाठी श्री. श्रीकांत सुंदरगिरी यांचे ३० तासांचे अत्यंत महत्वाचे सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विदयार्थ्यांना ग्रुप डिस्कशन, रिझ्यूम बिल्डींग, मॉक इंटरइव्हयू, लिंकडिन प्रोफाईल, इग्लीश ग्रामर, व्हरसेंट टेस्ट इ. आवश्यक असणा-या कौशल्याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पंढरपूर सिंहगड महाविदयालयाचा भर विदयार्थ्यांमध्ये कौशल्य विकसीत करण्यावर असतो. या सॉप्टस्कीलच्या प्रशिक्षणाचा विदयार्थ्यांना बहूमूल्य फायदा भविष्यात कॅम्पस प्लेसमेंटसाठी होणार आहे. सोलापूर जिल्हयामध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विदयार्थ्यांसाठी कॉग्नीझंट, एलटीआय माईंड ट्री इ. नामांकित बहूराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी फक्त सिंहगड महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठीच उपलब्ध होत आहेत. चालू शैक्षणिक वर्षात आजपर्यंत सुमारे ५८ कंपन्यामध्ये नोकरीची संधी अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad