पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव उत्साहात संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव उत्साहात संपन्न*



पंढरपूर : प्रतिनिधी


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार, दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


या मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अंजली पिसे तसेच पालक प्रतिनिधी श्री. विलास बिले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी श्री. विलास बिले यांचा सत्कार डॉ. समीर कटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.


मेळाव्यात डॉ. अल्ताफ मुलाणी व डॉ. समीर कटेकर यांनी विभागातील शैक्षणिक प्रगती व प्रशिक्षण-नियोजन विभागाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पालक प्रतिनिधींसह इतर पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.


कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाब व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिता शिंदे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. अंजली पिसे, प्रा. स्वप्निल टाकले यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. सानिका बाबर व कु. शितल चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिता शिंदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.