सिंहगड महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात बौध्दिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन*

 *सिंहगड महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात बौध्दिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन*




एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights - IPR) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आय.पी.आर विषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन व शोध यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. व्ही. एस. बिरादारउपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपदेचे विविध प्रकार यांची सविस्तर माहिती दिली. तसेच पेटंट कसे दाखल करायचे, कोणती प्रक्रिया असते, आवश्यक कागदपत्रे, आणि विविध प्रकारांची उदाहरणे देत अत्यंत समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण करण्यात आले.

डॉ. बिरादार यांनी प्रत्यक्ष उदाहरणे, केस स्टडीजच्या माध्यमातून बौद्धिक संपदेचे व्यावसायीकरण कसे करता येते, संशोधन, नवनिर्मिती व स्टार्टअप्समध्ये याचे महत्त्व काय आहे, हेही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रकल्प, संशोधन यामध्ये आय.पी.आर बाबत जागरूक राहण्याचे आणि सृजनशील विचारांची योग्य नोंद ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेतले गेले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पेटंट नोंदणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि आय.पी.आर क्षेत्रातील संधी यावर उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. विचारलेल्या प्रश्नांचे निरसन उदाहरणांसहित समजावून सांगण्यात आले. 

विभागप्रमुख डॉ.शिवशंकर कोंडूरु यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अंजली चांदणे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.