पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर श्री. एन. एस. बनसोडे (वोडाफोन इंडिया सर्विसेस प्रा. लिमिटेड, पुणे) यांची कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री. एन. एस. बनसोडे यांचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पायथॉन प्रोग्रामिंगच्या मूलभूत संकल्पना तसेच त्याच्या उद्योगातील महत्त्वपूर्ण उपयोगांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

श्री. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना पायथॉन चा उपयोग डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कसा करता येतो, याची माहिती दिली. त्यांनी थेट डेमो आणि प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांचे समज विस्तृत केले.

 विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना श्री. बनसोडे यांनी सखोल उत्तरे दिली. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पायथॉन प्रोग्रामिंगसंदर्भात आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यातील संधींबाबत त्यांना नवीन दृष्टिकोन मिळाला आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. माधव नाईकनवरे, प्रा. वैभव गोडसे प्रा. स्वप्निल टाकळे यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.