*पंढरपूर सिंहगडमध्ये सायबरसिक्युरिटी आणि थ्रेट मिटिगेशन विषयावर श्री. मयंक कुमार यांचे ऑनलाईन मार्गदर्शन*
ACSpire ऑनलाईन व्याख्यान मालिका अंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व जोखीम व्यवस्थापन विषयक मौल्यवान मार्गदर्शन
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संघटना (ACSES) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ACSpire ऑनलाईन व्याख्यान मालिका अंतर्गत एक आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा संस्था (PwC) या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपनीतील असोसिएट टेक कन्सल्टंट (SPOC) श्री. मयंक कुमार यांचे ऑनलाईन मार्गदर्शन गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडले असल्याची माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
"सायबरसिक्युरिटी आणि थ्रेट मिटिगेशन" या विषयावर आयोजित या विशेष सत्रात, श्री. कुमार यांनी विद्यार्थ्यांना सायबर धोके, जोखीम व्यवस्थापन, आधुनिक सुरक्षा उपाययोजना, तसेच SIEM, SOAR, ITSM, धोक्यांची शोध मोहीम आणि स्वयंचलित सुरक्षा कार्यप्रवाह यांसारख्या अत्याधुनिक संकल्पनांची सखोल माहिती दिली.
श्री. मयंक कुमार हे Certified Ethical Hacker (प्रमाणित नैतिक हॅकर) असून त्यांना AZ-500, ISO 27001, Qualys, MSS & MDDR, SIEM & SOAR Solutions यामध्ये विशेष प्राविण्य आहे. सायबरसिक्युरिटी क्षेत्रात त्यांना २ वर्षे ९ महिने व्यावसायिक अनुभव असून, त्यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये यशस्वी योगदान दिले आहे.
त्यांनी डिझाईन व ऑप्टिमायझेशनद्वारे घटनेवर प्रतिसाद देण्याचा वेळ (Incident Response Time) मध्ये ४०% घट, ९०% सुरक्षा घटना सेवा स्तर करार (SLA) च्या मर्यादेत सोडविणे, स्वयंचलित कार्यप्रवाह तयार करणे, तसेच क्लायंट-आधारित धोका शोध मोहीम (Client-Initiated Threat Hunts) यशस्वीरीत्या पार पाडणे यासारखी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ३५ हून अधिक टीम सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना सायबरसिक्युरिटी, रिस्क मॅनेजमेंट व आधुनिक सुरक्षा उपाययोजना याबाबत सखोल आणि उपयुक्त ज्ञान मिळाले. कार्यक्रमात संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सांगता प्रा. सुमीत इंगोले यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. या व्याख्यानाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संगणक अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

