सिंहगड पंढरपूर येथे "वाउंड फॉर सक्सेस – इनोव्हेशन इन मशीन वाइंडिंग टेक्नॉलॉजी" विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न*

 *सिंहगड पंढरपूर येथे "वाउंड फॉर सक्सेस – इनोव्हेशन इन मशीन वाइंडिंग टेक्नॉलॉजी" विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न*




कोर्टी, पंढरपूर – सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी "वाउंड फॉर सक्सेस – इनोव्हेशन इन मशीन वाइंडिंग टेक्नॉलॉजी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांनी दिली.

ही कार्यशाळा विद्युत अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक मोटर्सचे टेस्टिंग, रिवाइंडिंग प्रक्रिया, तसेच मोटर टेस्टिंग मीटर्सचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यामधून मोटर दुरुस्ती व निदान प्रक्रियेची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे श्री. गणेश पांढरे (ज्योतिर्लिंग मोटार रिवाइंडिंग, करकंब) यांचे प्रास्ताविक व सत्कार करण्यात आले. त्यांनी मोटर वाइंडिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. डी. एम. कोरके तसेच विभागातील इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad