*एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा
शनिवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता*.
हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
या मेळाव्याची सुरुवात पालक प्रतिनिधी रफिक नदाफ, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने झाली.
या मेळाव्यात पालक प्रतिनिधी रफिक नदाफ यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या मेळाव्या वेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थित पालकांना संबोधित केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले.
दरम्यान पालक रफिक नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. रफिक नदाफ बोलताना म्हणाले, पालकांचे आपल्या पाल्याचा शैक्षणिक गोष्टींकडे लक्ष्य असणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी महाविद्यालयाच्या संपर्कात राहण्यास ही आवाहन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच विध्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीचे विशेष कौतुक केले.
या मेळाव्यात विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी विभागाचा आढावा सादर केला. यादरम्यान कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यापिठात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालक मेळावा प्रतिनिधी प्रा. उदयकुमार फुले, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उदयकुमार फुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. नामदेव सावंत यांनी मानले.

