पंढरपूर सिंहगडमध्ये उद्योजकता व नवोन्मेष : करिअरचा पर्याय या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये उद्योजकता व नवोन्मेष : करिअरचा पर्याय या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन*




पंढरपूर, ३० ऑगस्ट २०२५ एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे उद्योजकता विकास कक्ष (EDC) व इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता व नवोन्मेष हा करिअरचा पर्याय या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे म्हणून मिस. भाग्यश्री एस. वठारे (Director & Founder, BVC) यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेतील संधी, नवकल्पनांचे महत्त्व व स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक पावले याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कल्पना जागृत करा, भविष्य घडवा आणि नवोन्मेष व उद्योजकतेच्या जगात पाऊल टाका असा प्रेरणादायी संदेश दिला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. जे. करांडे होते. तसेच डॉ. एस. जी. कुलकर्णी (उपप्राचार्य व इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल, अध्यक्ष) आणि प्रा. अतुल कुलकर्णी उद्योजकता विकास कक्ष (EDC इन्चार्ज ) यांची उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून नवीन कल्पनांना चालना मिळाल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad