एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी‍ विभागामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) मार्फत “इंडस्ट्रियल ऑटोमेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*

 *एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी‍ विभागामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) मार्फत “इंडस्ट्रियल ऑटोमेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*



पंढरपूर : एस. के. एन. सिंघगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील विद्यार्थी संघटनेच्या वतीने "इंडस्ट्रियल ऑटोमेशन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

ही कार्यशाळा दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कॉलेजच्या इलेक्ट्रिकल सेमिनार हॉल येथे पार पडली. या कार्यशाळेचे उदघाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात औद्योगिक क्षेत्रात सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व विशद केले. 

कार्यशाळेसाठी श्री. शुभम शर्मा (सोफकॉन इंडिया प्रा. लि.) हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शिवशंकर कोंडूरु यांनी प्रमुख पाहुणे श्री. शुभम शर्मा (सोफकॉन इंडिया प्रा. लि.) यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. 

प्रमुख वक्ते श्री. शुभम शर्मा यांनी इंडस्ट्रियल ऑटोमेशनविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती देणे व त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा होता. कार्यशाळेमध्ये PLC, SCADA, HMI, सेन्सर्स आदी औद्योगिक स्वयंचलन तंत्रज्ञानांची सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देण्यात आली. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, प्रत्यक्ष उपकरणांवर काम करून दाखवत प्रशिक्षण दिल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता.

उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रकारचे उपयुक्त व मार्गदर्शक उपक्रम पुढील काळात देखील आयोजित करण्यात यावेत, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली.

कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता कार्यशाळेचे समन्वयक प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. अमोल गोडसे व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad