सांगोला तालुकास्तरीय भव्य तबलावादन स्पर्धेमध्ये देवळे येथील श्रवण नवनाथ माळी याचा प्रथम क्रमांक*

 सांगोला तालुकास्तरीय भव्य तबलावादन स्पर्धेमध्ये देवळे येथील श्रवण नवनाथ माळी याचा प्रथम क्रमांक


श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त माजी नगरसेवक श्री.सोमेश यावलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला येथे दत्त मंदिर महादेव गल्ली मंदिरामध्ये भव्य तबला वादन स्पर्धा 29 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या तबला वादन स्पर्धेमध्ये देवळे येथील श्रवण नवनाथ माळी या बालकाचा लहान गटामध्ये परीक्षक. पंडित अतुल ताडे सर व व त्यांचे शिष्यवर्ग यांच्या निरीक्षणाने प्रथम क्रमांक दिला. श्रवण माळी यांचा प्रथम क्रमांक आल्यामुळे मा.नगरसेवक सोमेश यावलकर सर यांच्यातर्फे श्रवण माळी यांना 7001 रुपये रोख रक्कम बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करून त्याचे अभिनंदन केले. श्रुती स्वरा क्लासचे गायन क्लास घेणारे पंडित श्री रामदास रोंगे (नाना) गुरुजी, तबला क्लास घेणारे श्री.सुधाकर कुंभार गुरुजी, श्री. धनंजय रोंगे गुरुजी, मच्छिंद्र कोळेकर, चिंतामणी खांडेकर, शिवाजी अनपट, व हनुमान भजनी मंडळ देवळे, व त्यांची आजी गोदाबाई माळी वडील श्री नवनाथ माळी व आई वंदना माळी बहीण श्रावणी माळी, व चुलते नागनाथ माळी, डॉ. मोहन माळी, दिलीप वसेकर, समाधान वसेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.