सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी एसपीएसएस सॉफ्टवेअरवरील कार्यशाळा संपन्न*

 *सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी एसपीएसएस सॉफ्टवेअरवरील कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात "एसपीएसएस सॉफ्टवेअरचा उपयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

ही कार्यशाळा मुख्यत्वे चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी होती. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना एसपीएसएस सॉफ्टवेअरच्या वापराबाबत सखोल माहिती देणे होता. यात रिग्रेशन एनालिसिस म्हणजे काय, त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कसा उपयोग होतो, तसेच विविध सांख्यिकी चाचण्या आणि त्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना रिग्रेशन एनालिसिस कसे करायचे याचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये एसपीएसएस सॉफ्टवेअर तसेच एक्सेलचा वापर कसा करता येतो हेही दाखवले गेले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना संशोधन कौशल्ये वाढवण्यास आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील डेटा विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे.

कार्यशाळेची सुरुवात स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. एस. कदम यांनी केली. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. ओमकार बिडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वाय. पी. पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad