*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने कापडी पिशव्या व स्टील बॉटलचे वाटप*
सिंहगड पंढरपूर येथील विदयार्थ्यांनी आषाढी वारी निमित्त पंढरपूर यात्रा
मार्गावर 'उत्कर्ष पर्यावरण वारी २०२५' हा मेगा कार्यक्रम उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी सांगीतली.
या उपक्रमाअंतर्गत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकबद्दल जागरूकता
करणे आणि आषाढी वारी ही प्लॅस्टीकमुक्त व पर्यावरणपूरक कशी होईल यासाठी
विदयार्थ्यांनी सर्वस्तरातून आलेल्या वारक-यांना आवाहन केले.
तसेच उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने १५ लाख कापडी पिशव्या आणि १५ लाख
स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. अशा या उपक्रमामुळे पंढरपूर यात्रा
एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्त होईल याची खात्री होईल असा विश्वास उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष ॲड. डी. आर. लोंढे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत
देशमुख, प्रा. गुरुराज इनामदर, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. सुमीत इंगोले राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

